Advertisement

तेजस ठाकरे यांचं नवीन संशोधन, माशाच्या प्रजातीचा लावला शोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि संशोधक तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आणखी एका नव्या प्रजातीच्या माशाचा शोध लावला आहे.

तेजस ठाकरे यांचं नवीन संशोधन, माशाच्या प्रजातीचा लावला शोध
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि संशोधक तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आणखी एका नव्या प्रजातीच्या माशाचा शोध लावला आहे.

माशाच्या प्रजातीबाबतची माहिती त्यांनीच आपल्या इन्स्टा पेजच्या (Instagram page) माध्यमातून दिली आहे. तेजस यांच्या या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय नियतकालिकानंही (international journal) घेतली आहे.

मेघालयातील खासी टेकड्यांतून (Khansi hills, meghalaya) तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मीळ असलेला चन्ना स्नेकहेड हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या माशाच्या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचंही तेजस यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय.

ऑरिस्टॉन यांनीच पहिल्यांदा या माशाची प्रजाती शोधली होती. या संशोधनात त्यांच्यासोबत जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलिथरन आणि एम. बॅंकिट हे सहभागी झाले होते.

'ऍक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकानं सप्टेंबरच्या अंकात या संशोधनाची दखल घेतलीय. सोबतच अंकाच्या मुखपृष्ठावरही त्यांनी या माशाचा फोटो घेतला आहे.

सोबतच या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध लिहून तेजस यांनी 'कोपिया - अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अ‍ॅंड हर्पेटॉलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल'ला पाठवला. या जर्नलनंही हे संशोधन प्रसिद्ध केलं.

काही दिवसांपूर्वीच तेजस यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतून स्चिस्तुरा हिरण्यकशी नावाची माशाची दुर्मिळ प्रजात शोधली होती. आजवर त्यांनी एकूण ११ दुर्मीळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. यापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या टीमनं पालीच्या प्रजातीचा देखील शोध लावला आहे.



हेही वाचा

नवी मुंबई, पनवेल, तळोजामधील वायू प्रदूषण तिपटीनं वाढलं

मेट्रोच्या 2B मार्गासाठी झाडे तोडण्याविरोधात चेंबूरच्या रहिवाशांचं चिपको आंदोलन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा