Advertisement

मेट्रोच्या 2B मार्गासाठी झाडे तोडण्याविरोधात चेंबूरच्या रहिवाशांचं चिपको आंदोलन

मानखुर्द इथल्या मेट्रो 2 बी प्रकल्पासाठी (डीएन नगर-मंडाळे) १५० हून अधिक झाडे बृहन्मुंबई महानगरपालिका तोडणार आहे.

मेट्रोच्या 2B मार्गासाठी झाडे तोडण्याविरोधात चेंबूरच्या रहिवाशांचं चिपको आंदोलन
SHARES

मानखुर्द इथल्या मेट्रो 2 बी प्रकल्पासाठी (डीएन नगर-मंडाळे) १५० हून अधिक झाडे बृहन्मुंबई महानगरपालिका तोडणार आहे. याविरोधात चेंबूरमधील रहिवासी एकवटले आहेत. चेंबूरमधील रहिवासी शांततेत चिपको आंदोलन करण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी योग्य जागा न मिळाल्यानं स्थानिकांनी झाडांवर नोटीस लावल्या आहेत.

चेंबूर सिटिझन्स फोरमचे सरचिटणीस हेमंत पेटारे म्हणाले की, “चेंबूर, हे अत्यंत प्रदूषित क्षेत्र आहे. त्यामुळे आम्ही पालिकेला विनंती करतो की, झाडं कापण्याआधी आपच्याची चर्चा करावी.”

१७३० मध्ये जोधपूरच्या राजाच्या सैनिकांचा विरोध बिश्नोई आदिवासींनी केला. त्यासाठी आदिवासिंनी झाडाला मिठी मारली. यात ३०० आदिवासी ठार झाले. त्याच चिपको चळवळीनं प्रेरित होऊन आम्हीही आंदोलन करू, असं मंचचे संस्थापक सदस्य आणि माजी नगरसेवक एस. बालकृष्णन यांनी सांगितलं.

मेट्रो प्रकल्पासाठी झाडांची छाटणी करावी. ती पूर्णपणे काढून टाकली जावी नाहीत, असं स्थानिकांचं म्हणणे आहे. ज्यात व्ही. एन. पुरव रोड, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो आणि मंडाळे जवळील एलिव्हेटेड स्टेशन या जागांचा समावेश आहे.

नागरी बागांचे अधीक्षक जे परदेशी म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासाठी मुंबई शहरात किती झाडे तोडली? आणि किती लावली गेली हे मी तुम्हाला ताबडतोब सांगू शकत नाही. दरम्यान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे पर्यावरणवादी बी. एन. कुमार यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे जाण्याची शिफारस स्थानिकांना केली आहे.



हेही वाचा

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

९६५ AQI सह वरळी सर्वाधिक प्रदूषित, दिल्लीलाही टाकलं मागे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा