Advertisement

मुंबईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन


मुंबईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन
SHARES

पाण्याची गुणवत्ता आणि जलचरांची मुबलकता उत्तम असल्याचा दाखला डॉल्फिनचे समुद्रातील अस्तित्व देते. जलसाखळीच्या दृष्टीनं डॉल्फिनचे अस्तित्व अत्यंत महत्तावाचे असते. पण गेल्या दोन-तीन वर्षात मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या किनाऱ्यांवर अनेक डॉल्फिन मृतावस्थेत  आढळले आहेत.  पुन्हा एकदा मुंबईच्या समुद्रकिनारी मृतास्थेत डॉल्फिन आढळले आहे. यामुळे समुद्रजीवांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 


 

कुठे आढळला डॉल्फिन? 

वर्सोवा समुद्रकिनारी स्वच्छता दूत अफरोज शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोमवारी मृत डॉल्फिन आढळून आला. तात्काळ वन अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या देखत मृत डॉल्फिनला क्रेनच्या मदतीनं वर्सोवा समुद्रकिनारी पुरण्यात आलं.  अफरोज शहा यांनी यासंदर्भात फेसबुकवर माहिती दिली.


 


 
अफरोज शहा यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, "मृत अवस्थेतील डॉल्फिन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वर्सोवा समुद्र किनारी आला आहे. हा खरच खूप वाईट अनुभव आहे. वन विभागाचे अधिकारी आले आहेत. आम्ही डॉल्फिनला वर्सोवा समुद्र किनारीच पुरलं. अमिताभ बच्चन यांचे मी आभार  मानतो. त्यांनी दिलेल्या जेसीबीचा उपयोग मृत डॉल्फिनला पुरण्यासाठी देखील झाला."  



डॉल्फिनचा मृत्यू कशामुळे? 

 
डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण हे समजू शकलं नाही. पण अन्नसाखळी बिघडण्यासह पाण्याचा पोत प्रदूषणामुळे खराब झाल्यानं डॉल्फिनचा मृत्यू होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
 


हेही वाचा

सर्वाधिक प्रदूषित शहरात मुंबई ४थ्या स्थानावर

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा