Advertisement

मुंबईच्या तापमानात मोठी घट


मुंबईच्या तापमानात मोठी घट
SHARES

सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या १० वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. ६ ते ७ अंशानी कमाल तापमानात घट झाली होती.

रविवारी सकाळी अंधेरी, विलेपार्लेसह काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. त्याच वेळी सौराष्ट्रावरून येणाऱ्या वाऱ्यांसह वाहून आलेले धूलिकण मुंबईच्या वातावरणात मिसळले. रविवारी दिवसभर त्यांचा प्रभाव मुंबईत जाणवत होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. 

सोमवारी सकाळपर्यंत हवेतील धूलिकण कायम राहणार असून तापमानातही घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईच्या कमाल तापमानात रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४३६ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे ३३६, माझगाव येथे ३७२, वरळी येथे ३१९, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४० असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत होती. कुलाबा येथील ‘हवा  गुणवत्ता निर्देशांक’ २२१ म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा