वाढत्या प्रदुषणाविरोधात जनजागृती रॅली

 Chembur
वाढत्या प्रदुषणाविरोधात जनजागृती रॅली
वाढत्या प्रदुषणाविरोधात जनजागृती रॅली
See all

चेंबूर - नॅशनल सर्वोदय शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाढत्या प्रदुषणाविरोधात जनजागृती रॅली काढली. चेंबूर नाका, चेंबूर स्थानक, सांडू उद्यान आणि डॉ. बाबासाहेब उद्यान या मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. या वेळी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. रॅलीमध्ये तीनशे मुलांनी सहभाग घेतला होता. गेल्या काही वर्षांत चेंबूर परिसरातील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढते काँक्रिटीकरण आणि जंगलांचा होणारा ऱ्हास असा अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढत आहे.

Loading Comments