फ्लेमिंगोंचं मुंबईत आगमन

मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फ्लेमिंगो पक्षाच्या थव्याचा फोटो शेअर केला आहे.

SHARE

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे अर्थात 'फ्लेमिंगो' म्हणजेच रोहित पक्ष्यांचं मुंबईत आगमन झालं आहे. मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फ्लेमिंगो पक्षाच्या थव्याचा फोटो शेअर केला आहे. दरवर्षी हिवाळ्यात गुलाबी पंख असलेले फ्लेमिंगो पक्षी मुंबईमधील दलदलीच्या भागात स्थलांतर करतात.

थंडीची चाहूल लागली की फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही म्हटले जाते. या पक्षांचे अनेक थवे सध्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत. मुंबईत दाखल झालेल्या याच फ्लेमिंगो पक्षांचा आकाशात भ्रमंती करतानाचा फोटो 'रिफ्लेकशन थ्रू माय लेन्स' आणि 'विद्यासागर हरिहरन' यांनी काढला. आकाशातील थव्याचा नयनरम्य फोटो काढल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेनं 'रिफ्लेकशन थ्रू माय लेन्स' आणि 'विद्यासागर हरिहरन' यांचे आभार मानले आहेत. तसंच तुम्हाला नैसर्गिक खजिन्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुटूंबासह 'महाराष्ट्र निसर्ग उद्यान'ला भेट द्या, असंही म्हटलं आहे.


मुंबईतील खाडी परीसरात फ्लेमिंगोचे मोठं-मोठे थवे पाहायला मिळतात. पक्षीप्रेमींसह पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावं, याकरिता मुंबई महापालिकेनं याबद्दल मुंबईकरांना आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या