Advertisement

मुंबईकरांसाठी ऑक्टोबर ठरला सर्वात 'ताप'दायक

यंदा पावसान निरोप घेण्याआधीच 'ऑक्टोबर हीट' ने चटके देण्यास सुरुवात केली होती. वाढलेल्या तापमानामुळे गेल्या दहा वर्षातील सर्वात कमाल तापमानाची दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची नोंद यंदाच्या ऑक्‍टोबरमध्ये नोंदवली गेली. त्याशिवाय यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात जवळपास नऊवेळा कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास दिसून आला आहे.

मुंबईकरांसाठी ऑक्टोबर ठरला सर्वात 'ताप'दायक
SHARES

यंदाचा वर्षीचा ऑक्टोबर महिना सर्वात तापदायक ठरला असून, रविवारी मुंबईतील तापमान ३८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. या तापमानामुळं हा ऑक्टोबर महिन्यातील नवा उच्चांक ठरला. विशेष म्हणजे हे तापमान इतक्या वर्षामधील ऑक्टोबर महिन्यांमध्ये नोंदवल गेलेल दुसऱ्या क्रमांकाचं उच्चांकी तापमान ठरलं. त्याशिवाय रविवारी राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानही मुंबईचेच होते.


२८ ऑक्टोबर उष्ण दिवस

यंदा पावसान निरोप घेण्याआधीच 'ऑक्टोबर हीट' ने चटके देण्यास सुरुवात केली होती. वाढलेल्या तापमानामुळे गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमाल तापमानाची दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची नोंद यंदाच्या ऑक्‍टोबरमध्ये नोंदवली गेली. त्याशिवाय यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात जवळपास नऊवेळा कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास दिसून आला आहे. त्यानुसार रविवारी २८ ऑक्टोबर हा दिवस ऑक्टोबरमधला दुसरा सर्वात उष्ण दिवस ठरला. सध्या मुंबईत पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी गरम असं विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे.


उच्चांकी तापमान

रविवारी सांताक्रूझ वेधशाळेनं ३८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद केली असून हे सरासरीहून तब्बल ३.८ अंशांनी अधिक आहे. तसंच कुलाबा वेधशाळेनं ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं असून हे सरासरीहून ३.२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होतं. यापूर्वी २०१५ मध्ये ३८.६ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान ऑक्टोबर महिन्यात नोंदवण्यात आलं होतं.

सध्या ऋतूबदलाचा काळ असल्यान हवेत असे बदल होत असल्याचं वेधशाळेचं निरीक्षण आहे. तसेच किनाऱ्यावरून सध्या पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे प्रभावी आहेत. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, प्रादेशिक हवामान खाते मुंबई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा