Advertisement

अशी पाखरे येती...


SHARES

वसई - लाल चोच, तपकिरी रंगाची मान, लाल पाय आणि करडा रंग, देखणा-रूबाबदार, ताशी 100 मैल म्हणजे तब्बल 160 किमी वेगाने गगनभरारी घेणारा हा रेड ब्रेस्टेट मर्ग्यांजर पक्षी. उत्तर अमेरीका आणि युरोपमध्ये आढळणारा बदकाच्या जातीतला हा पक्षी थंडीच्या दिवसात रशिया आणि चीनमध्ये वास्तव्याला येतो. पण यंदा हा पक्षी चक्क भारतात, तोही मुंबईजवळ वसईत विसाव्याला आलाय. या रेड ब्रेस्टेड मर्ग्यांजरला पाहून पक्षीप्रेमी भारावलेत. तर भारतात पहिल्यांदाच हा पक्षी आल्याचा दावा पक्षीप्रेमींचा दावा आहे.


वसईतील राजीवली मिठागरजवळ हा दुर्मिळ पक्षी आल्याचं वसई आणि मुंबईतील पक्षीप्रेमींना गेल्या आठवड्यातच समजलं होतं. त्यामुळे त्यांनी थेट येथे धाव घेत या पक्षाला डोळेभरून पाहिलं. सोशल मीडियावरून ही बातमी षटकर्णी झाली. मर्ग्यांजरचं देखणं रुप डोळ्यात साठवण्यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळवरून पक्षीप्रेमी धाव घेत आहेत. साधारण महिनाभर मर्ग्यांजर इथला पाहुणचार घेणार आहे. हा रुबाबदार पक्षी पाहण्याची संधी पक्षीप्रेमींना उपलब्ध झालीय. माग वाट कसली पाहताय पक्षीप्रेमी मुंबईकरांनो? चला लवकर गाठा राजीवली.

संबंधित विषय
Advertisement