सायकलिंगमधून पर्यावरण जनजागृती

मुंबई - औद्योगिकीरणाच्या नावाखाली सध्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होतेय. झाडे नष्ट झाल्यामुळे प्रदुषणाचा विळखा देखील वाढलाय. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'रोड रेंजर्स'ने पुढाकार घेतलाय.

या तरुणांची स्वारी गोव्याला निघालीय. सायकलवरून मुंबई गोवा असा हे तरुण प्रवास करणार आहेत. नुसता प्रवासच करणार नाहीत तर जाताना पनवेल, पुणे, कराड, गोवा याठिकाणी वृक्षरोपण देखील करणार आहेत. त्यासाठी त्यांनी सोबत 100 रोपटी देखील घेतली आहेत.

Loading Comments