Advertisement

आज आणि उद्या मुंबईत मुसळधार पाऊस, पालिका सतर्क

राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार आहे.

आज आणि उद्या मुंबईत मुसळधार पाऊस, पालिका सतर्क
SHARES

राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार असून रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यासोबतच मुंबई आणि परिसरात १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज आणि उद्या मुंबई आणि लगतच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या बुधवार 13 जुलै सकाळपासून मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

मुसळधार पावसाचा इशारा पाहता पालिकेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहे. यासोबतच एनडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1)-2, पालघर-1, रायगड-महाड-2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) एकूण 13 ) ) पथके तैनात आहेत. नांदेड-1 आणि गडचिरोली-1 येथे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) म्हणजे मुंबई-3, पुणे-1, नागपूर-1 आणि धुळे-2, नागपूर-2 ची 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) कायमस्वरूपी तुकडी आहेत.



हेही वाचा

मुंबईसह राज्यात ४ दिवस मुसळधार पाऊस, IMD कडून रेड अलर्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा