Advertisement

'या' दिवशी आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून; कसं पडलं 'हे' नाव, जाणून घ्या

यावेळी खगोलदृष्टया एक अनोखी घटना आकाशात घडणार असून ती अनुभवता देखील येणार आहे.

'या' दिवशी आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून; कसं पडलं 'हे' नाव, जाणून घ्या
SHARES

२४ जून म्हणजे उद्या ग्रीष्म संक्रातीनंतरची पहिली पौर्णिमा आहे. यावेळी खगोलदृष्टया एक अनोखी घटना आकाशात घडणार असून ती अनुभवता देखील येणार आहे. उद्या आकाशात चंद्र स्ट्रॉबेरी रंगामध्ये दिसणार आहे. या खगोलीय घटनेला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात.

या दिवशी चंद्राचा आकार मोठा आणि रंग (Colour) काहीसा स्ट्रॉबेरी सारखा असेल. जून महिन्यातील पौर्णिमेला दिसणाऱ्या अशा चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात. काही ठिकाणी या चंद्राला हॉट मून (Hot Moon) किंवा हनी मून (Honey Moon) असं म्हणतात.

विशेष काय?

यावेळी चंद्र आपल्या कक्षेतून पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने तो सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्याला चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हटलं जातं.

स्ट्रॉबेरी मून हे नाव कसं दिलं?

स्ट्रॉबेरी मून हे नाव प्राचीन अमेरिकी आदिवासींनी दिलेलं आहे. या आदिवासींच्या म्हणण्यानुसार, अशा पूर्ण चंद्राचं दर्शन झाल्यानं तो दिवस पौर्णिमेचा समजला जातो आणि स्ट्रॉबेरी कापणीस सुरुवात केली जाते.

खरंतर, स्ट्रॉबेरी मून हे अमेरिकेतील (America) एक स्थानिक नाव (Local Name) आहे. जगातील विविध देशांमध्ये या चंद्राला विविध नावांनी ओळखलं जाते. युरोपमध्ये स्ट्रॉबेरी मून हा रोज मून नावानं ओळखला जातो.

युरोपात गुलाब कापणीचं (Rose Harvesting) प्रतिक समजला जातो. उत्तर गोलार्धात हा चंद्र हॉट मून म्हणून ओळखला जातो. कारण हा चंद्र विषुववृत्ताच्या उत्तरेस उन्हाळा सुरू झाल्याचं सूचित करतो. त्यामुळे या भागात असा चंद्र उन्हाळा प्रारंभाचं (Summer Season) प्रतिक मानलं जातं.

२४ जूनला दिसणारा स्ट्रॉबेरी मून देखील खास असेल. हिंदु पंचांगानुसार, स्ट्रॉबेरी मून वसंत ऋतूची शेवटची पौर्णिमा आणि ग्रीष्म ऋतूची पहिली पौर्णिमा यांचं प्रतिक मानलं जातं. स्ट्रॉबेरी मूननंतर २४ जुलैला बक मून आणि २२ ऑगस्टला स्टर्जजन मून दिसणार आहे.



हेही वाचा

वडाळा मेट्रो स्टेशनसाठी खारफुटीवर कुऱ्हाड, MMRDA च्या निर्णयावर पर्यावरण तज्ञ नाराज

राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा