Advertisement

वडाळा मेट्रो स्टेशनसाठी खारफुटीवर कुऱ्हाड, MMRDA च्या निर्णयावर पर्यावरण तज्ञ नाराज

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (MMRDA) आता वडाळा ठाणे मेट्रो लाईनसाठी खारफुटी तोडणार असल्याचं समोर आलं आहे.

वडाळा मेट्रो स्टेशनसाठी खारफुटीवर कुऱ्हाड, MMRDA च्या निर्णयावर पर्यावरण तज्ञ नाराज
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (MMRDA) आता वडाळा ठाणे मेट्रो लाईनसाठी खारफुटी (Mangroves) तोडणार असल्याचं समोर आलं आहे. एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन तयार करण्यासाठी वडाळाच्या भक्ती पार्क इथल्या एक हेक्टर भूभागातील खारफुटी साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MMRDAचे संचालक (कार्य) प्रमोद आहुजा म्हणाले, मेट्रो लाइन (Metro Station) ४ वरील खारफुटीचे छोटे क्षेत्र आहे जे आपण वापरणार आहोत. आम्हाला मुंबई उच्च न्यायालय (High Court) आणि इतर सर्व अधिकाऱ्यांची परवानगी मिळाली आहे. या प्लॉटवर खनदाट खारफुटीची झाडं नाहीत.”

दरम्यान, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक (मॅनग्रोव्ह प्रोटेक्शन सेल) वीरेंद्र तिवारी म्हणाले की, खारफुटीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी एजन्सी "नुकसान भरपाई वनीकरण" मोहीम हाती घेणार आहे.”

पर्यावरणीय तज्ञ या निर्णयावर फारसे खूष नाहीत. स्टेशनच्या बांधकामासाठी पुरेशी जमीन असूनही या जमिनीवरील खारफुटी का कापली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते डी स्टालिन म्हणाले, “या भागातील खारफुटी खासगी विकसकांच्या ताब्यात देण्यात आली होती. आता ते खारफुटी क्षेत्राच्या मागे लागले आहेत. वडाळा इथल्या बेस्ट डेपो आणि ट्रक टर्मिनलमध्ये स्टेशन होऊ शकते. आमच्या मते अनावश्यक इथली खारफुटी साफ केली जात आहे.”

झोरू भठेना यांनीही एमएमआरडीएच्या कथित उणीवांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला की, “एलिव्हेटेड स्टेशनसाठी एक हेक्टर भूखंडावरील झाडं तोडणं पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्ण खारफुटी साफ करण्यापेक्षा जिथं पिलर उभारण्यात येणार तेवढ्याच भागातील खारफुटी काढणं आवश्यक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी वाचवण्यास मदत होईल.”

वडला ते कासारवदावली या मेट्रो लाईन ४चं एक स्टेशन एलिव्हेटेड कॉरिडॉरवर ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावर २ स्थानके असतील. पूर्वेकडील एक्सप्रेस रोडवे, मोनोरेल, मध्य रेल्वे तसंच सध्या निर्माणाधीन मेट्रो मार्गावर संपर्क स्थापित होईल.



हेही वाचा

राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार

शहरांतील जुने वृक्ष होणार ‘हेरिटेज ट्री’, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा