Advertisement

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, IMDकडून अलर्ट

दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, IMDकडून अलर्ट
SHARES

विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे.

हवामान खात्यानं जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी ७ मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे.

तसंच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मंगळवारी म्हणजेच ८ मार्च राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील ६ तासांत १५ किमी प्रतितास वेगानं उत्तर-वायव्य दिशेनं सरकला आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.



हेही वाचा

कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३चे कारशेड आरे वसाहतीत उभारणार?

वांद्रे समुद्रकिनारी पालिका उभारणार 'ट्री हाऊस'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा