Advertisement

मुंबई, उपनगरांमध्ये पावसाची शक्यता


मुंबई, उपनगरांमध्ये पावसाची शक्यता
SHARES

मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं गुरुवारी सकाळी मुसळधार हजेरी लावली. या पावसामुळं चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं लागलं. परंतु उकाड्यातून दिलासा मिळाल्यानं अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, हवामान विभागानं अंदाज वर्तवल्या प्रमाणे शहर व उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

'गुरुवारी सकाळी ११:२२ वाजेच्या सुमारास ४.०५ मिंटानी भरती येणार आहे. तेसच रात्री २३:०१ सुमारा ३.४६ मिंटानी भरती येणार असल्याचे सांगितले आहे. तर ओहोटी १७:१९ वाजता २.०९ मी येण्याची शक्यता आहे. इतकचं नाही तर गेल्या २४ तासात सरासरी पावसाची नोंद देखील करण्यात आली आहे. याप्रमाने शहरात येत्या 24 तासात ७.३७ मिमी पावसाच्या सरी बरसणार आहे. तसेच पूर्व उपनगरात २०.८६ मिमी,पश्चिम उपनगरात ४.२३ मिमी पाऊस पडणार आहे' असं हवामान विभागाने समुद्राला येणाऱ्या भरती आणि ओहोटीच्या वेळीची माहिती देत ट्विट केले आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन मुंबईत तसेच ठाण्यात आज सकाळपासूनच ८.३० वाजता येत्या २४ तासात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्याता आहे.आयएमडीने दर्शविल्याप्रमाणे पुढील २,३ तासांमध्ये पावसाच्या अंदाजासह मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा