मुंबईत किती झाडं? वेबसाईटवर पहाता येणार

  Vidhan Bhavan
  मुंबईत किती झाडं? वेबसाईटवर पहाता येणार
  मुंबई  -  

  मुंबई - सर्व महापालिकांच्या हद्दीत असणारी झाडे, प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यासाठी दिलेली परवानगी, त्याबदल्यात लावण्यात आलेली झाडे या सगळ्यांची एकत्रित माहिती आता वेबसाईटवर पाहता येणार आहे. बेकायदा वृक्षतोडीवर नियंत्रण रहावे म्हणून यासंदर्भात महापालिकांना एकत्रित वेबसाईट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. याचवेळी मुंबईत गेल्या 5 वर्षात तोडण्यात आलेल्या 25 हजार झाडांचा अहवाल मागवण्यात येणार आहे. मुंबईतील नाहूर गाव येथील पिरॅमल रिअॅलिटी विकासकाने इमारतीच्या बांधकामासाठी तोडलेल्या झाडांबाबत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.

  शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विंनती केली की, "कित्येक वेळा बिल्डरकडून झाडे लावली जात नाहीत. तर बऱ्याच वेळा रोपटे लावले जाते त्याचे फोटो दाखवले जातात. मात्र ती झाडे जगली आहेत की मृत आहेत याबद्दलही पारदर्शकता आणून ती माहितीही वेबसाइटवर द्यावी."

  मुंबईत 2010 ते 2016 या कालावधीत विविध विकास कामांसाठी सुमारे 25 हजार वृक्ष तोडण्यास मुंबई महापालिकेन परवानगी दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या हद्दीतील झाडांच्या सद्यस्थितीची एकत्रित माहिती देणारी एक वेबसाईट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये झाडांची सद्यस्थिती, त्यांचा नंबर, विकास प्रकल्पामध्ये ते झाड आल्यास त्याला तोडण्याची देण्यात आलेली परवानगी, त्याच्या बदल्यात लावण्यात आलेली झाडे अथवा त्याचे झालेले प्रत्यारोपण याची फोटोसहित माहिती यावर टाकण्यात येईल. तसेच ही माहिती सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही क्षणी पाहता येईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.