Advertisement

महाडमध्ये दरड कोसळून ३० घरं मातीखाली, ७२ जण बेपत्ता

पावसाचा जोर कायम असल्यानं मदतकार्य धीम्या गतीनं सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

महाडमध्ये दरड कोसळून ३० घरं मातीखाली, ७२ जण बेपत्ता
SHARES

महाड इथं दरड कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये तब्बल ३२ घरांवर दरड कोसळली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. मदतकार्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे.

महाड इथल्या तळये गावात दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये तब्बल ७५ जणं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालुका बिरवाडी पासून १४ किलोमीटरवर तळीये या गावी गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळली.

यामध्ये सुमारे ३२ घरं गाडली गेली असून ७२ लोक बेपत्ता आहेत. तळीयेच्या सरपंचांनी याबाबत माहिती दिली. या ठिकाणी NDRF ची मदत पाठविण्यात आली आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्यानं मदतकार्य धीम्या गतीनं सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यात गुंजाळी (Gunjali) नावाच्या गावात भूस्खलन (Land sliding) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्खं गाव खचू शकतं अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना तातडीनं इतरत्र हलवण्याचे (Shift) आदेश प्रशासनानं (administration) दिले आहेत.

दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या भागात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोकणातील पूरपरिस्थिती पाहता कोयना वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणार पाणी बंद करण्यात आलं आहे. पुढील तीन दिवसांच्या पावसाचा अंदाज पाहता कोकण आणि कोल्हापूर, सांगलीत प्रशासन सज्ज करण्यात आलं आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा