पुढील दोन दिवसांत म्हणजे 2 आणि 3 जुलै रोजी मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात बहुतांशी मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
4 आणि 5 जुलै रोजी हा हलका मध्यम पाऊस असेल कारण पावसाची तीव्रता कमी होईल. 6 जुलैपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. उत्तर भागात जास्त पाऊस अपेक्षित आहे, दक्षिण मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे.
पुढील 72 तास महत्त्वाचे
येत्या 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे या भागांसाठी नारंगी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. याशिवाय 3 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिकसाठी यलो अलर्ट याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर येथे पाऊस अपेक्षित आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस नाशिकमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाचा जोर शनिवार पासून कमी झालेला नाही. दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
हेही वाचा