• महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा होणार कायापालट
SHARE

मुंबई - येथील 1994 मध्ये तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा कायपालट होणार आहे. उद्यानाला लागूनच असलेल्या मिठी नदीचाही मेकओव्हर होणार आहे आणि तेही पर्यावरणाला कुठेही धक्का न पोहोचवता. शीव, धारावी आणि बीकेसी यांना जोडणारा पादचारी पुलही उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने निसर्ग उद्यान ते बीकेसी पादचारी पुलासाठी डिझाईन मागवलं होतं. त्यानुसार 30 कंपन्यांमधून सिटी कोलॅबोरेटर कंपनीच्या डिझाईनची निवड करण्यात आली.

असा असेल मेकओव्हर

 • निसर्ग उद्यान ते बीकेसी 400 मीटर पादचारी पूल
 • बर्ड वॉचिंग टॉवर
 • बर्ड ब्लाईंड वॉक्स
 • सायकल ट्रॅक
 • बटरफ्लाय गार्डन
 • फार्म्स मार्केट
 • वॉटर रिसायकल प्लॅन्ट
 • ओरिएन्टेशन सेंटर
 • लायब्ररी
 • कॅफेटेरिया
 • प्रशासकीय इमारत
 • प्रकल्पाचा अंदाजित खर्च 60 कोटी

हा मेकओव्हर प्रत्यक्षात साकार होण्यासाठी बराच काळ आहे. पण या मेकओव्हरमुळे निसर्ग उद्यानाला एक नवी ओळख मिळणार असल्यानं हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जातोय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

निर्दयी
भीषण