Advertisement

दिल्ली, अहमदाबादची हवा मुंबईपेक्षा जास्त विषारी

आंतरराष्ट्रीय जर्नल इल्सेवियर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही माहिती उघड झाली आहे.

दिल्ली, अहमदाबादची हवा मुंबईपेक्षा जास्त विषारी
SHARES

दिल्ली आणि अहमदाबादची हवा देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा जास्त विषारी आहे. मुंबईमध्ये वर्षभरात विविध स्त्रोतांमधून ४५ गीगाग्राम पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ उत्सर्जित केले. तर दिल्लीनं ७७ गिगाग्राम आणि अहमदाबादने ५७ गिगाग्राम पीएम २.५ उत्सर्जित केले.

आंतरराष्ट्रीय जर्नल इल्सेवियर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही माहिती उघड झाली आहे.

मुंबईच्या १५ टक्के बायो फ्लूय प्रदूषण, दिल्लीच्या ३ टक्के, अहमदाबादच्या १० टक्के आणि पुण्याच्या ११ टक्केमध्ये पीएम २.५ चे प्रमाण आढळले आहे. पुण्यात सर्वाधिक २२ टक्के औद्योगित प्रदूषणात पीएम २.५ आढळला आहे. अशा प्रकारे दिल्लीमध्ये १९ टक्के, अहमदाबादमध्ये १९ टक्के आणि मुंबईत १५ टक्के औद्योगिक प्रदूषण होते.

SAFAR च्या संशोधन अहवालानुसार, दिल्लीमध्ये वाहतुकीमुळे सर्वाधिक ४१ टक्के PM २.५ उत्सर्जन होते. तर मुंबईत या स्त्रोतापेक्षा ३१ टक्के, अहमदाबादमध्ये ३५ टक्के आणि पुण्यात ४० टक्के उत्सर्जित पीएमचे उत्सर्जन होते. मुंबईतील झोपडपट्टी भागात कचरा आणि इतर गोष्टी उघड्यावर जाळल्यामुळे, बायो फ्यूल प्रदूषणमध्ये पीएम २.५ चे प्रमाण अधिक आहे.

शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेत एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (AQLI) -2019 चा अहवाल प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये वायु प्रदुषणामुळे ४० टक्के भारतीय नागरिकांचे वय ९ वर्षांनी कमी होण्याचा धोका वर्तवण्यात आला होता. यावरून भारतातील वायू प्रदूषणाच्या धोक्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या चार महानगरांमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीवर माहिती गोळा करण्यासाठी SAFAR ने एक मॉडेल तयार केलं. आता या मॉडेलचा संशोधन अहवाल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झाला आहे.



हेही वाचा

भायखळा प्राणीसंग्रहालयात २ पेंग्विन पिल्लांचा जन्म, 'ही' ठेवली नावं

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा