Advertisement

भायखळा प्राणीसंग्रहालयात २ पेंग्विन पिल्लांचा जन्म, 'ही' ठेवली नावं

सध्या दोन्ही पेंग्विन स्थिर आहेत आणि प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आहे.

भायखळा प्राणीसंग्रहालयात २ पेंग्विन पिल्लांचा जन्म, 'ही' ठेवली नावं
SHARES

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. यावर्षी ११ मे रोजी वीरमाता जिजाबाई उद्यानातील सात हम्बोल्ट पेंग्विनपैकी दोन हम्बोल्ट पेंग्विन डोनाल्ड आणि डेझी यांना एक पिल्लू झालं. त्याचं नाव ओरिओ असं ठेवण्यात आलं आहे.

तर १९ ऑगस्ट रोजी हंबोल्ट्समधील सर्वात वयस्कर मादी फ्लिपर आणि प्राणी संग्रहालयातील सर्वात लहान नर पेंग्विन मिस्टर मोल्ट यांच्याकडे आणखी एका पिल्लाचा जन्म झाला. पिल्लू फक्त २५ दिवसांचं असून त्याचं संपूर्णपणे संगोपन केलं जात आहे. त्याची लिंग तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही.

वयाच्या तीन महिन्यांपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यानं पिले आजारांना बळी पडू शकतात. म्हणून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. सध्या दोन्ही पेंग्विन स्थिर आहेत आणि प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आहे.

याव्यतिरिक्त दररोज सकाळी पिल्लाचे वजन तपासून त्यानुसार पिल्लाला कोणत्याही पूरक आहाराची आवश्यकता आहे का, याची तपासणी केली जाते. ओरिओ आता ४ महिन्‍यांचा आहे. इतर पेंग्‍वीनच्या हल्ल्यापासून त्याला स्वतःचे संरक्षण करण्यास शिकवलं आहे.

ओरिओ सतत त्याच्या घरट्यात न जाता मुख्यतः बबल या मादी पेंग्विनसोबत वेळ घालवतो आणि प्रदर्शनी परिसरात फिरतो. ओरिओ आता प्रौढ पेंग्विनप्रमाणे मासे खातो आणि आता त्याला कोणत्याही विशेष आहाराची आवश्यकता नाही.

ओरिओला आता किशोरवयातील पेंग्विन सारखे आवरण (Juvenile Coat) आले असून सुमारे एक वर्षाचा होईपर्यंत त्याला प्रौढ पेंग्विनप्रमाणे आवरण (adult coat) येईल. ही घडण प्रक्रिया तरुण पेंग्विनसाठी खूप तणावपूर्ण असते म्हणून त्याची काळजी घेतली जात आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन सुविधा त्यांच्या जैविक, वर्तणूक आणि शारीरिक आवश्यकता विचारात घेऊन विकसित करण्यात आली आहे.

उत्तम जलश्रेणीसाठी प्रगत एलएसएस सुविधा, स्वच्छ हवेच्या अभिसरणासाठी एएचयू यंत्रणा, पेंग्विनच्या 24/7 देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पशुवैदयकीय अधिकारी, प्रणिपाल आणि अभियंते इत्यादी पेंग्विनच्या काळजी आणि व्यवस्थापनासाठी सुसज्ज आहे.



हेही वाचा

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर

पूरस्थिती रोखण्यासाठी मुंबई भोवती तटबंदीचा पर्याय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा