मुंबईकरांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय म्हणजे, सोमवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी शहराचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५०२ वर पोहोचला, जो सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार अतिशय खराब श्रेणीत येतो.
किमान मंगळवार, २५ जानेवारीपर्यंत हवेची गुणवत्ता 'गंभीर' राहण्याची शक्यता आहे. ५०० पेक्षा जास्त AQI 'अतिशय खराब' किंवा घातक प्रदूषण पातळी दर्शवतो. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (CPCB) दक्षिण मुंबईतील माझगाव इथल्या मॉनिटरिंग स्टेशनवर, त्यानंतर कुलाब्यातील नवी नगर आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ इथं कमाल ५०० AQI नोंदवला.
मुंबईतील सर्व १६ CPCB मॉनिटरिंग स्टेशनचा सरासरी AQI आज सकाळी ११ वाजता ४०५च्या ‘गंभीर’ स्तरावर होता.
एकूण AQI रविवारी सकाळी १८० (मध्यम) वरून संध्याकाळपर्यंत ३३३ (अत्यंत खराब) वर घसरला. सर्वात जास्त प्रदूषित हवा मालाडमध्ये आहे. ज्याचा AQI ४३६ नोंदवला गेला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील पारा घसरला आहे. मुंबईत जानेवारीचे तापमान १० वर्षांतील सर्वात कमी आहे.
अहवालानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेनं सोमवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी किमान तापमान १५°C नोंदवले तर कुलाबा वेधशाळेत किमान तापमान १६.२°C नोंदवले गेले.
वृत्तानुसार, २६ जानेवारीपासून बुधवारपासून मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
शनिवारी, २२ जानेवारी रोजी, मुंबईत हलका पाऊस झाला आणि त्यानंतर रविवारी, २३ जानेवारी रोजी, बलुचिस्तान, पाकिस्तानमधून अधूनमधून धूळ वाढवणाऱ्या वाऱ्यांमुळे शहरात धुळीची चादर पसरली, असं अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचा