Advertisement

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई-गोवा हाय वे बंद

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचं पाणी मुंबई गोवा महामार्गावर आलं आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग १२ तासांसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई-गोवा हाय वे बंद
SHARES

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचं पाणी मुंबई गोवा महामार्गावर आलं आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग १२ तासांसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महामार्गावर सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. 

सुरक्षेचा उपाय म्हणून दापोली महामार्गही देखील बंद करण्यात आला आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी ६ मीटर आहे. या नदीचं पाणी धोक्याची पातळी ओलांडून ६.५ मीटरवर पोहोचलं आहे. यामुळे बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी भागही पाण्याखाली गेला आहे. यामुळे शेजारच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

जगबुडीची पाणी पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी ६.०० मीटर एवढी आहे. जगबुडी नदीने सोमवारी सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली.हेही वाचा- 

मृत्यूच्या छपराखालील पोलिसांची सुटका कधी?

वरळी सी-लिंकवरून तरुणाची आत्महत्यासंबंधित विषय
Advertisement