वरळी सी-लिंकवरून तरुणाची आत्महत्या

पार्थने सीलिॆकवर अचानक टँक्सी वाल्याला टँक्सी थांबवण्यास सांगितली. फोनवर बोलत असल्याचा बनाव करून पार्थ टँक्सीतून उतरला. टँक्सीवाल्याला काही समजाच्या आतच त्याने समुद्रात उडी टाकली.

वरळी सी-लिंकवरून तरुणाची आत्महत्या
SHARES
मुंबईच्या वांद्रे- वरळी सी लिंकवर टॅक्सीतून आलेल्या २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. पार्थ सोमाणी (२३) असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पार्थचा शोध सुरू आहे.


बोटीने शोध सुरू

मुलुंड येथे पार्थ हा राहणार असून सीएकडे नोकरी करत होता. मुलुंड येथे पार्थ हा राहणारा असून सीएकडे नोकरी करत होता. शुक्रवारी  दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास पार्थ वरळीकडून वांद्रे येथे जात होता. त्यावेळी पार्थने सी लिंकवर अचानक टॅक्सीवाल्याला टॅक्सी थांबवण्यास सांगितली. फोनवर बोलत असल्याचा बनाव करून पार्थ टॅक्सीतून उतरला. टॅक्सीवाल्याला काही समजाच्या आतच त्याने समुद्रात उडी टाकली. टॅक्सीवाल्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने जवळील टोल नाक्यावर घडलेला प्रकार सांगितला आणि पार्थचा शोध सुरू झाला.  अग्निशमन दल आणि पोलिसांनी वरळी व माहिम कोळीवाल्यांच्या बोटीने पार्थचा शोध सुरू केला आहे. तर मदतीसाठी नेव्हीचे हेलिकाॅप्टर ही गस्त घालत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा