Advertisement

मुंबईत सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद, आरोग्यासाठी धोकादायक

गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी, मुंबईतील प्रदूषण पातळीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद, आरोग्यासाठी धोकादायक
SHARES

गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी, मुंबईतील प्रदूषण पातळीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २५२ नोंदवला गेला. २५२ हे AQI सर्वात खराब म्हणून ओळखला जातो. दुसर्‍याच दिवशी, शहरात २०१ इतक्या AQIची नोंद झाली. हा AQI मुंबई महानगर प्रदेश (MMR)मधला १० ठिकाणांचा आहे.

१०० किंवा त्यापेक्षा कमी असलेला AQI समाधानकारक मानला जातो. तथापि, जेव्हा एक्यूआय मूल्ये १००च्या वर असतात तेव्हा हवेची गुणवत्ती खालावलेली मानली जाते. २०१ ते ३०० पर्यंत AQI हानीकारक मानला जातो. या हवामानात मुलांना दम्याचा त्रास आणि हृदय किंवा फुफ्फुसांचा आजारा संभवू शकतो. याशिवाय ज्यांना हे आजार आहेत त्यांच्यासाठी हवा अधिक धोकादायक आहे. दुसरीकडे, जेव्हा AQI ३०० पेक्षा जास्त असेल तेव्हा प्रत्येकासाठी घराबाहेर जाणं धोकादायक आहे.

मार्चनंतरचा सर्वात जास्त १२१ एक्यूआय १३ ऑक्टोबरला होता. कोरोनव्हायरसमुळे लागू लॉकडाऊनमुळे तापमानात घट झाली होती. पण अनलॉक होताच शहरभर AQI मध्ये वाढ नोंदवली आहे. वायू प्रदूषणामुळे हवेतील लहान कण असलेल्या पार्टिकुलेट मॅटरमध्ये लक्षणीय वाढ होते. हे लहान कण श्वास घेतल्यावर हवेमार्फत मानवी शरीरात जातात. ज्यामुळे शरीरातील सर्व मुख्य अवयवांचं गंभीर नुकसान होतं. हे विशेषतः फुफ्फुसांवर परिणाम करतात.



हेही वाचा

महाराष्ट्र : २०२०मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

मुंबईतील मालाड, बोरिवली सर्वाधिक प्रदूषित

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा