Advertisement

मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल


मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल
SHARES

मुंबई - एक गुलाबी बातमी आहे... थंडी आपल्या उंबरठ्यावर आलीय. दोन-तीन दिवसांपासून सकाळच्या तापमानात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. गुरूवारी सकाळी मुंबईत 20.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे थंडी लवकरच मुंबईत दाखल होणार हे स्पष्ट झालंय.
सध्या दिवसभर मुंबईत सगळीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर थंडीचं आगमन हा मोठाच दिलासा ठरावा. ऑक्टोबर महिन्यात अनेकदा दिवसा वाढलेल्या तापमानानंतर संध्याकाळी पावसाच्या सरी आणि सोबतीला विजांचा गडगडाट-कडकडाट असा कार्यक्रम असतो. यंदा अजून तरी तो झालेला नाही.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि उन्हाळा मात्र चांगलाच कडकडीत होता. पण, यंदा पावसानं कृपादृष्टी दाखवली आणि राज्यात सगळीकडेच चांगला पाऊस पडला. त्यामुळे बळीराजासह सगळेच सुखावले होते. आता पाऊस चांगल्या झाल्यानं थंडीही चांगली पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांनाही सकाळी हुडहुडी भरणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा