Advertisement

चला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा परिसर करू स्वच्छ - एएलएमचा नारा


चला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा परिसर करू स्वच्छ - एएलएमचा नारा
SHARES

आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी 2000 साली माहीम मोहल्ला कमिटीने पालिकेच्या स्वच्छ आणि हरित अभियानाचा केंद्रबिंदू ठरलेल्या 'प्रगत परिसर व्यवस्थापन' (एएलएम) उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मोहल्ला कमिटीने एएलएमची स्थापना केल्यापासून त्या आजतागायत गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वच्छतेचा नारा बुलंद केला आहे. यासाठी 2007 साली 'माय स्ट्रीट, क्लीन स्ट्रीट' हे अभियान मोहल्ला कमिटीने राबवले.

केवळ मुंबईच नव्हे तर देशभरात स्वच्छतेचे अभियान कसे राबवता येईल आणि या अभियानात वेगवेगळ्या घटकांना कसे सामावून घेता येईल, त्यांच्यात जनजागृती कशी करता येईल? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर 'माहीम मोहल्ला कमिटी एएलएम' काम करत आहे. मुंबईच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 'मोहल्ला कमिटी एएलएम' प्रामुख्याने माहीम, दादर, परळ, धारावी या विभागात स्वछता अभियान राबवत आहे. माहीम मोहल्ला कमिटी एएलएमच्या अभियानाला आतापर्यंत या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असे माहीम मोहल्ला कमिटी एएलएमच्या सदस्या शोभा राव म्हणाल्या.

स्वच्छता मोहिमेचा संदेश घराघरात पोहचवण्यासाठी मोहल्ला कमिटीने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहे. 2022 पर्यंत अधिकाधिक नागरिकांना स्वछतेच्या दिशेने वळवण्यासाठी कमिटीने 'वॉव क्लिन इंडिया बाय 2022' नावाचे फेसबुक पेज तयार केले आहे. या वेब पेजवर स्वच्छतेविषयी नवनवीन विचार मांडले जातात.

पालिकेचे अधिकारी माहीम मोहल्ला कमिटी एएलएमला वेळोवेळी मदत करत असतात. त्यामुळे जनसभागातून शहर सुधारण्यास मदत मिळते, अशी माहिती पालिका एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांनी दिली.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेविषयीचे प्रश्न गंभीर निर्माण झाले आहेत. पण जर सर्वांनी मिळून ठरवल्यास देशभरात स्वच्छता अभियान नक्कची प्रभावीपणे राबवण्यात मदत होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा