मढ समुद्रकिनारी पालिकेची स्वच्छता मोहीम

 Madh Island
मढ समुद्रकिनारी पालिकेची स्वच्छता मोहीम
मढ समुद्रकिनारी पालिकेची स्वच्छता मोहीम
मढ समुद्रकिनारी पालिकेची स्वच्छता मोहीम
मढ समुद्रकिनारी पालिकेची स्वच्छता मोहीम
See all

मालाड - मढ कोळीवाडा समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी 1 जेसीबी, 1 ट्रॅक्टर, 15 कर्मचाऱ्यांच्या मदतीने समुद्रकिनाऱ्याची साफसफाई केली. सोमवारी पूर्ण दिवस हे अभियान पालिका पी उत्तर विभागाने राबवले. मंगळवारी देखील ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पी उत्तर पालिका विभागाच्या घन कचरा विभागाकडून सांगण्यात आले.

स्वच्छता अभियानासाठी मालाडचे आमदार असलम शेख यांनी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल पी उत्तर पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी घेतली. या स्वच्छता अभियानामुळे समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

Loading Comments