मुंबईत यंदा झाला 60% जास्त पाऊस

 Pali Hill
मुंबईत यंदा झाला 60% जास्त पाऊस

मुंबई - मुंबईवर यंदा वरुणराजानं चांगलीच कृपादृष्टी दाखवलीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 60.93 टक्के अधिक पाऊस झालाय. मुंबई महानगरपालिकेच्या 60 स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे नोंदवण्यात आलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालंय. पूर्व उपनगरांत यंदा 2514.69 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत 2595.18 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस मुलुंडमध्ये पडलाय. तर सर्वात कमी पाऊस कुलाबा परिसरात झाल्याची माहिती पालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंद केलेल्या माहितीतून समोर आलीये.

        वर्ष                 कालावधी       एकूण पाऊस
       2015           1 जून ते 30 सप्टेंबर    1516.47 मिमि
       2016           1 जून ते 30 सप्टेंबर     2491.88 मिमि

 

Loading Comments