Advertisement

कांदिवलीतील 'बोलक्या भिंती'

नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सेव्ह आर्ट आणि रेसिडेंट फोरम यांनी हा उपक्रम राबवला. जेजे आर्ट्सचे माजी विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात जवळपास १०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता.

कांदिवलीतील 'बोलक्या भिंती'
SHARES

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर कांदिवली येथील ठाकूर व्हिलेजमध्ये शनिवार आणि रविवारी एक उपक्रम राबवण्यात आला. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी रेसिडेंट फोरम, सेव्ह आर्ट आणि महापालिका यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.  




काय आहे हा उपक्रम?

आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी ठाकूर व्हिलेजचे रहिवासी सजग झाले आहेत. अग्निशमन केंद्राच्या मागच्या २००० चौरस फूट भिंतीवर स्वच्छतेसाठी त्यांनी सुंदर चित्र रेखाटली आहेत. या उपक्रमाअंतर्गत अग्निशमन दलाची भिंत वेगवेगळ्या रंगानी रंगली आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सेव्ह आर्ट आणि रेसिडेंट फोरम यांनी हा उपक्रम राबवला. जेजे आर्ट्सचे माजी विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात जवळपास १०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. लहानांपासून  ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. 



इथं कुंचल्याच्या माध्यमातून पर्यावरण बचाव असे संदेश रेखाटण्यात आले. झाडे लावा झाडे वाचवा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, हॉर्न नॉट ओके प्लीज असे अनेक संदेश देण्यात आले आहेत. या चित्रांमुळे भिंती सजीव झाल्या आहे. अतिशय सुंदर अशी ही चित्रे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 




हेही वाचा-

युनायटेड नेशननं घेतली मुंबईच्या स्वच्छता मोहिमेची दखल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा