Advertisement

'आरे वाचवा' मोहिमेला पाच वर्षे पूर्ण

पर्यावरणप्रेमींनी मोहिमेच्या सहाव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. मोहीम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांनी यावेळी तरुणाईला मार्गदर्शन केले.

'आरे वाचवा' मोहिमेला पाच वर्षे पूर्ण
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे काॅलनीत होणार आहे. या कारशेडसाठी २ हजारांहून अधिक झाडांचा बळी जाणार आहे. त्यामुळे २०१४ पासून 'आरे वाचवा' ही मोहीम सुरू झाली. या मोहिमेला आता ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आरेतील पिकनिक पॉइंट येथे रविवारी पर्यावरणप्रेमी एकत्र आले होते.  चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी एकत्र आलेल्या या पर्यावरणप्रेमींनी विकास प्रकल्पांसाठी आता एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा निर्धार केला आहे. 

यावेळी पर्यावरणप्रेमींनी मोहिमेच्या सहाव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. मोहीम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांनी यावेळी तरुणाईला मार्गदर्शन केले. मोहिमेशी कसे जोडलो गेलो याचे अनुभव प्रत्येकाने सांगितले. आरेतील झाडे वाचविण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू, अशी शपथ मानवी साखळी तयार करून पर्यावरणप्रेमींनी घेतली.

वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन म्हणाले की, मोहीम सुरू केल्यावर लोक वाढत गेले आणि मोहिमेचा आज वटवृक्ष झाला आहे. भविष्यात पर्यावरणावर कोणते संकट येणार आहे, यासाठी सावधगिरी आणि जाणीव करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमींना एकत्र बोलावण्यात आले होते. पुढील काळात मोहिमेला एक चांगली दिशा कशी देता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा