Advertisement

झाडांच्या कत्तलीविरोधात मुंबईकर आक्रमक


झाडांच्या कत्तलीविरोधात मुंबईकर आक्रमक
SHARES

मुंबई - मेट्रो - 3 प्रकल्पांतर्गत चर्चगेट, कफ परेड आणि आसपासच्या झाडांची कत्तल केली जाऊ नये यासाठी सेव्ह ट्रीच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. झाडे तोडण्यास अद्याप स्थगिती देण्यात आली नसली तरी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत झाडे तोडली जाऊ नयेत अशी भूमिका सेव्ह ट्रीने घेतली आहे.

मात्र गेल्या आठवड्यापासून चर्चगेटपरिसरातील काही झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. तर उर्वरित ठिकाणीही झाडे तोडण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे सेव्ह ट्रीने आता आक्रमक भूमिका घेतली असून पालिकेचे कर्मचारी झाडे तोडण्यासाठी आल्यास त्यांना विरोध करायचा निर्णय सेव्ह ट्रीने घेतल्याची माहिती सदस्या नैना वर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळवारी कफ परेड भागात झाडे तोडण्यास पालिका कर्मचारी येणार असल्याची माहिती सेव्ह ट्रीला मिळाली होती. त्यानुसार या कामाला विरोध करण्याची जोरदार तयारी अर्थात रस्त्यावर उतरण्याची तयारी सेव्ह ट्रीने केली होती. मात्र ही कारवाई मंगळवारी झालीच नाही. पण यापुढे ही कारवाई न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका सेव्ह ट्रीने घेतल्याची माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य रुचिर बन्सल यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा