Advertisement

मुंबईत पडला २३१.४ मिमी पाऊस!


मुंबईत पडला २३१.४ मिमी पाऊस!
SHARES

मुंबईमध्ये शनिवार रात्रीपासून सुरु झालेला पाऊस थांबण्याची कुठलीही चिन्हं नसून हा पाऊस पुढील ४ दिवस असाच पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई परिसरात मागील २४ तासांमध्ये २३१.४ मिमी पाऊस पडल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने दिली.

सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच राहणार असून मंगळवारीही शहर-उपनगरात पाऊस कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडेल. २८ जून नंतर पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो. २८ जून नंतर १ जुलैपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो. तर १ जुलै नंतर पाऊस पुन्हा जोर पकडू शकतो, असं कुलाबा वेधशाळेचे ड्युटी ऑफिसर
जी.आर. चांदेकर यांनी सांगितलं.


सोमवार दुपारपर्यंतच्या पावसाची सरासरी

  • कुलाबा ९९ मिमी
  • वडाळा ९९ मिमी
  • ठाणे २१० मिमी
  • सांताक्रूज २३१.४ मिमी
  • पनवेल १५९ मिमी
  • नवी मुंबई १७० मिमी
  • कल्याण १५९ मिमी
  • चेंबूर २०१ मिमी
  • भांडुप २२२ मिमी
  • उल्हासनगर १३४ मिमी
  • अंबरनाथ १०७ मिमी
  • भिवंडी १५० मिमी
  • अलिबाग १५० मिमी
  • पेण १६० मिमी
  • डहाणू २२६ मिमी



हेही वाचा-

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे, दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा