मुंबईच्या तापमानात ५ अंशाने घट, गारवा आणखी वाढणार

मागील ५ दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात ५ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने महाराष्ट्रातही गारवा वाढला आहे. या वाऱ्याचा प्रभाव आणखी २ दिवस राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्कायमेटने दिली.

SHARE

मागील ३ दिवसांपासून मुंबईतील गारवा चांगलाच वाढला आहे. सोमवारी मुंबई उपनगरातील किमान तापमान १६.८ आणि कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबईतील तापमानात आणखी घट होऊ शकते.


म्हणून गारवा वाढला

मागील ५ दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात ५ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने महाराष्ट्रातही गारवा वाढला आहे. या वाऱ्याचा प्रभाव आणखी २ दिवस राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्कायमेटने दिली. परिणामी मुंबईतील तापमान पुढच्या २ दिवसांत आणखी घटू शकतं, त्यामुळे मुंबईकरांनी जॅकेट वापरायला हरकत नाही.


थंडीसाठी प्रतीक्षा

सोमवारचा दिवस मुंबईकरांसाठी सर्वात कमी तापमानाचा दिवस ठरला असला, तरी २ दिवसानंतर पुन्हा तापमानात वाढ होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर खऱ्या अर्थाने थंडी सुरू व्हायला आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या