बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनं नोंदवलेले कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस आहे. जे सामान्यपेक्षा ५.४ अंश जास्त होते. शहरातील दिवसाच्या तापमानात २४ तासांत पाच अंशांनी वाढ झाली आहे.
आयएमडी (IMD) कुलाबा वेधशाळेद्वारे बुधवारी नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. हे तापमान एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या ३०.५ अंश सेल्सिअसपेक्षा चार अंशांनी जास्त आहे. बुधवारी IMD कुलाबानं कमाल तापमानाची नोंद सामान्यपेक्षा सुमारे ३ अंश सेल्सिअसनं केली आहे.
आयएमडीनं व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटलं होतं की, कोरड्या हवामानासह कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, बुधवारी IMD कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी नोंदवलेलं किमान तापमान अनुक्रमे २३.४ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस होतं. गेल्या वर्षी मार्चमध्ये कमाल तापमान २८ मार्च रोजी ४०.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं.
मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी ४१.७ अंश सेल्सिअस नोंदवलं होतं.
हेही वाचा