Advertisement

माटुंगा, वडाळाला पुराचा तर चेंबूर, गोवंडीला उष्णतेचा धोका: MCAP

मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (MCAP) साठी आयोजित असुरक्षितता आणि जोखीम मूल्यांकनात हे उघड झाले आहे.

माटुंगा, वडाळाला पुराचा तर चेंबूर, गोवंडीला उष्णतेचा धोका: MCAP
SHARES

माटुंगा, अँटॉप हिल, वडाळा आणि सायन या भागांना पावसाळ्यातील पुराचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे संबंधित एफ/उत्तर प्रशासकीय प्रभागातील ६६.८% लोकसंख्या पूर-प्रवण क्षेत्राच्या २५० मीटर परिसरात राहते.

मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (MCAP) साठी आयोजित असुरक्षितता आणि जोखीम मूल्यांकनात हे उघड झाले आहे. यात हे देखील नमूद करण्यात आलं आहे की, या प्रभागातील केवळ ३२% लोकसंख्येला पुराच्या वेळी आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मालाड (पी/उत्तर वॉर्ड) पुराच्या बाबतीत सर्वात कमी असुरक्षित आहे. एमसीएपीनुसार, इथल्या लोकसंख्येपैकी फक्त १५.४% प्रभावित होण्याची शक्यता आहे. एकूणच, मुंबईच्या लोकसंख्येपैकी ३५% लोक पालिकेच्या २५० मीटर परिसरात राहतात.

गोवंडी आणि मानखुर्द (एम/पूर्व प्रभाग) या भागांमध्ये राहणाऱ्यांना येत्या काळात अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. इथली ४०% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या पृष्ठभागाचे तापमान ३५ अंश C पेक्षा जास्त आहे.

कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट आणि चर्चगेटशी संबंधित असलेला ए वॉर्ड, शहरी उष्णतेच्या संपर्कात येण्यापासून सर्वात कमी असुरक्षित आहे, ज्याच्या लोकसंख्येच्या फक्त ०.९२% प्रभावित आहेत.

हवामान जोखीम, लोकसंख्याशास्त्रीय प्रभाव, सामाजिक-आर्थिक पैलू, भौतिक पैलू आणि पायाभूत सेवांच्या पैलूंसाठी विश्लेषण केलं गेलं आहे.

हे पॅरामीटर्स १८ निर्देशकांसह तपासले गेले आहेत. जसं की, शहरी उष्णता; शहरी पूर; शहरी मोकळ्या जागा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, मास ट्रान्झिट, आरोग्य सेवा आणि अग्निशमन सेवा यासारख्या ३५ पॅरामीटर्समध्ये याचे विभाजन करण्यात आले आहे.

३५ पैकी १८ पॅरामीटर्सच्या बाबतीत M/पूर्व वॉर्ड सर्वात असुरक्षित म्हणून उदयास आला आहे.  तर एच/पश्चिम प्रभागातील केवळ १५% पुराच्या वेळी लोकसंख्येला अग्निशमन सेवा मिळण्याची शक्यता आहे.

एस वॉर्डच्या बाबतीत, (भांडुप क्षेत्र) फक्त ३८.९% लोकसंख्येला नियमित दिवशी अग्निशामक बचाव सेवा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते या पॅरामीटरमध्ये सर्वात असुरक्षित बनले आहेत.

एफ/उत्तर वॉर्डातील पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकसंख्येवरील MCAP च्या निष्कर्षांबद्दल, निखिल देसाई, जे की माटुंग्यातील रहिवासी आहेत, ते म्हणाले की, “२००५ पासून, वर्षानुवर्षे या भागात पूर आला आहे. पालिकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे ते कमी करण्यात यश आले आहे. १५ वर्षांपासून रहिवासी यातून जात आहेत. पूरस्थिती कमी करण्यासाठी जबाबदारी आणि निर्णायक धोरणाची हीच वेळ आहे.



हेही वाचा

जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम १० तास आधीच पूर्ण

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर होणार कारवाई

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा