लालबाग - काश्मीर खोर्यातील बांदीपोरा येथे 26 जानेवारीला झालेल्या हिमवादळात भारतीय लष्कराच्या 14 जवानांचा मृत्यू झाला. यात अकोला जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश आहे. अकोल्यातील आनंद गवई आणि त्याच जिल्हयातील माना येथील संजय सुरेशराव खंडारे आणि धारूर तालुक्यातील गांजपूरचा विकास समुद्रे अशी त्या जवानांची नावे आहेत. या मृत पावलेल्या भारतीय सैनिकांना लालबाग येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी चित्रफुलांच्या रंगावलीतून श्रद्धांजली वाहिली.