Advertisement

तिसऱ्या दिवशी अभिजित आणि रुपाली झाली भावूक

अभिजित बिचुकले यांचा वाद घरातील बहुतेक सदस्यांबरोबर आहे, तर पहिल्या दिवसापासून शिवानी सुर्वेसोबत असलेला वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. यानंतर अभिजित बिचुकले शिवानी सुर्वेला नॉमिनेशनमधून वाचविण्यास तयार होतील का?

तिसऱ्या दिवशी अभिजित आणि रुपाली झाली भावूक
SHARES

'बिग बॉस' मराठीचं दुसरं पर्व सुरुवातीलाच आपले रंग दाखवू लागलं आहे. दोन दिवस पूर्ण होतात न होतात तोच तिसऱ्या दिवशी या घरातील दोन सदस्य भावूक झाले आहेत.


सवाल ऐरणीचा

'बिग बॉस' मराठी सिझन २ मध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगतो आहे. या टास्कमध्ये घराबाहेर जाण्यासाठी प्रत्येक टीममधून एक एक सदस्याचं नाव 'बिग बॉस' घेत आहेत. ज्या सदस्याचं नाव घेतलं जाईल त्या सदस्यानं संदेश पत्रात असलेल्या सदस्याला लिहिलेली गोष्ट करण्यास पटवायचं आहे. या सवाल ऐरणीचा टास्कमध्ये शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या दोघींनी अनुक्रमे अभिजित बिचुकले आणि वैशाली म्हाडे यांना संदेश पत्रात देलेली गोष्ट करण्यास पटवायचं आहे. 


शह-काटशहाचा डाव

अभिजित बिचुकले यांचा वाद घरातील बहुतेक सदस्यांबरोबर आहे, तर पहिल्या दिवसापासून शिवानी सुर्वेसोबत असलेला वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. यानंतर अभिजित बिचुकले शिवानी सुर्वेला नॉमिनेशनमधून वाचविण्यास तयार होतील का?  नेहा शितोळेला वाचविण्यासाठी वैशाली म्हाडे तयार होईल का ? हे पुढे पहायला मिळणार आहे. त्यामुळं 'बिग बॉस' मराठीच्या सुरुवातीच्या काळातच शह-काटशहाचा डाव पहायला मिळत आहे. या खेळात कोण कोणला मात देतो आणि कोणाला सुरक्षित करतो हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


अश्रू अनावर 

याच टास्क दरम्यान अभिजित केळकर आणि रुपाली भोसले खूप भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. कारण असं कि, सवाल ऐरणीचा या टास्कमध्ये विणा जगताप आणि मैथिली जावकर यांच्यासाठी अनुक्रमे अभिजित आणि रुपाली यांना 'बिग बॉस' यांनी सांगितलेल्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत. अभिजित केळकरला त्याच्या मुलांचे आणि कुटुंबाचे फोटो, तर रुपालीला तिच्या भावाने दिलेला टेडी नष्ट करायचा आहे. आता अभिजित आणि रुपाली या गोष्टी नष्ट करून विणा आणि मैथिलीला वाचवू शकतील का? हे देखील पहायला मिळणार आहे.हेही वाचा-

३ जूनला रंगणार प्रायोगिक नाट्य महोत्सव; अरुण नलावडे आणि निर्मिती सावंत यांना पुरस्कार

'कुडीए नी' म्हणत येणार अपारशक्तीचं सिंगल
संबंधित विषय
Advertisement