Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

'स्वराज्य जननी जिजामाता'च्या रूपात अमृता पवार

आज प्रत्येक वाहिनीवर कोणती ना कोणती ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांसमोर इतिहासाची पानं उलगडत असताना सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य जननी जिजामाता' ही मालिका प्रसारीत होणार आहे.

'स्वराज्य जननी जिजामाता'च्या रूपात अमृता पवार
SHARES

आज प्रत्येक वाहिनीवर कोणती ना कोणती ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांसमोर इतिहासाची पानं उलगडत असताना सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य जननी जिजामाता' ही मालिका प्रसारीत होणार आहे.


वीरमातेची जीवनगाथा 

स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा म्हणजेच जिजाबाईंचा होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं, तिथे-तिथे या रयतेच्या राजाचा उल्लेख होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळं शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊ. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा या प्रवासात अमूल्य वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्तानं या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.


१९ ऑगस्टपासून प्रेक्षकांसमोर

या राजमातेचा जीवनप्रवास १९ ऑगस्ट पासून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेची छोटीशी झलक टीझर स्वरूपात नुकतीच सोनी मराठीवर प्रसारीत करण्यात आली आहे. ऐतिहासिक मालिकांची उत्सुकता महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळाली आहे. याच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी मालिका आता सोनी मराठीवर येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचं जगदंब क्रिएशन्स यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. त्यामुळं अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिका, नाटकं हे समीकरण पुन्हा एकदा 'स्वराज्य जननी जिजामाता'च्या निमित्तानं प्रेक्षक पाहू शकणार आहेत.


पुन्हा एक शिवधनुष्य

स्वराज्याच्या जननीचा संपूर्ण प्रवास उलगडणाऱ्या या मालिकेत स्वराज्य जननीच्या रूपात अमृता पवार दिसणार आहे. राजमाता जिजाऊंच्या भूमिकेतून अमृताच्या अभिनयाचे नवे पैलू पाहणं, प्रेक्षकांसाठीऔत्सुक्याचं ठरणार आहे. 'स्वराज्य जननी जिजामाता' ही जगदंब क्रिएशन्सची दुसरी निर्मिती असून, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान अमोल कोल्हेंनी स्वीकारलं आहे. शहाजीराजांची स्वराज्य संकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्य संस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं आव्हानात्मक काम आहे.हेही वाचा-

केव्हीआर ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा