Advertisement

केव्हीआर ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !

बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या केव्हीआर ग्रुपमधील भांडण मिटायलाच तयार नाही. एक मुद्दा झाला की, लगेच दुसरा मुद्दा... तो संपत नाही, तर तिसरा मुद्दा डोकं वर काढतो...

केव्हीआर ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या केव्हीआर ग्रुपमधील भांडण मिटायलाच तयार नाही. एक मुद्दा झाला की, लगेच दुसरा मुद्दा... तो संपत नाही, तर तिसरा मुद्दा डोकं वर काढतो... त्यामुळं घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरी या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे हेच कळत नाही. काय गैरसमज आहेत?  कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत? याबद्दल प्रश्नचिन्हच आहे. 


एकमेकांसोबत भांडण

कधी वीणाचं रुपालीसोबत भांडण होतं, तर कधी किशोरी यांच्यासोबत. कधी रुपाली वीणावर नाराज होते, तर कधी किशोरींवर. कधी किशोरी वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात, तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधील. या गदारोळातच आठवडे संपत आहेत. कधी ग्रुप आहे आणि ग्रुप बनून खेळणार असं म्हणतात, तर कधी वैयक्तिक खेळत आहेत असं म्हणतात. यामध्ये किशोरींचा मुद्दा असा आहे कि, मी आता माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या सदस्यांशी बोलत आहे. कालच माधवशी चर्चा करताना त्या म्हणाल्या की, मला खूप फ्री झाल्यासारखं वाटतं आहे.


मी नेहमीच गप्प असते

या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषयही तोच आहे. रूपालीचं म्हणणे आहे की, आज जे मी गाण म्हटलं ते म्हणूनच होतं की, अजूनही मला कुठेतरी वाटत आहे की आपण तिघी एकत्र आहोत, तू ऐकलं नाहीस का ते. त्यावर किशोरी म्हणाल्या की, मला डबल डबल वागायला जमत नाही, मी एकमार्गीच वागते. कधी एक बोलायचं, तर कधी दूसरं बोलायचं... यामध्ये मला नाही अडकायचं आहे. त्यावर वीणा म्हणाली की, असं कोणीच करत नाही. त्यावर रुपाली म्हणाली की, पंचिंग बॅगवाला जो टास्क होता त्यावर तुझा फोटो लावण्याचं काही कारण होतं हे मला तुझ्याशी बोलताच येत नाही, तुला सांगता येत नाही काही, तुला समजवता येत नाही. त्यावर किशोरी म्हणाल्या की, मी नेहमीच गप्प असते तुम्ही दोघीच बोलत असता. 


आरोप प्रत्यारोप

रुपालीचं म्हणणं काही वेगळंच आहे. रुपाली म्हणाली की, हे तू सगळ्यांनाच सांगितलं आहे. त्यावर किशोरी म्हणाल्या की, मला सांगायची गरज नाही. त्यावर रुपाली म्हणाली की, हे तू हिनाला सांगितलं माझ्यासमोर आणि वीणा म्हणाली, किशोरी असं देखील म्हणाल्या, कर्म आहे, सगळ्यांचं कर्म इथेच फिटतील, इथून जाण्याच्या आधी सगळे भोगून जातील. त्यावर किशोरी म्हणाल्या की, शिवला तू म्हणालीस स्वत:च्या डोक्यानं नाही खेळत, तुम्ही दोघी माझ्यामागे बोलता. त्यावर दोघींचं म्हणणं होतं मागे नाही समोर बोललो आम्ही... आणि आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले. मला यावर नाही बोलायचं असं बोलून किशोरी तिथून उठून गेल्या. त्यामुळं बिग बॉसच्या घरात काहीसं वेगळंच वातावरण पहायला मिळत आहे.



हेही वाचा -

रुपाली-अभिजीतमध्ये रंगणार कॅप्टन्सीची लढत

'स्माईल प्लीज' म्हणत मुक्ता बनली फोटोग्राफर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा