Advertisement

'स्माईल प्लीज' म्हणत मुक्ता बनली फोटोग्राफर

काही कलाकार आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी काहीही करायला तयार असतात. मुक्ता बर्वे ही मराठमोळी अभिनेत्रीही त्यापैकीच एक आहे. 'स्माईल प्लीज' या आगामी चित्रपटासाठी ती फोटोग्राफर बनली आहे.

'स्माईल प्लीज' म्हणत मुक्ता बनली फोटोग्राफर
SHARES

काही कलाकार आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी काहीही करायला तयार असतात. मुक्ता बर्वे ही मराठमोळी अभिनेत्रीही त्यापैकीच एक आहे. 'स्माईल प्लीज' या आगामी चित्रपटासाठी ती फोटोग्राफर बनली आहे.


यशस्वी फोटोग्राफरची भूमिका

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणारी मुक्ता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मुक्ता तिच्या आगामी 'स्माईल प्लीज' या चित्रपटात एका यशस्वी फोटोग्राफरची भूमिका साकारत आहे. ही भूमिका अधिक नैसर्गिक वाटावी यासाठी तिने फोटोग्राफीसाठी आवश्यक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. कॅमेरा हाताळताना शरीराची ठेवण कशी असावी इथपासून ते फोटो काढण्यापर्यंत सर्वच गोष्टी ती शिकली आहे.  


फोटोग्राफी शिकता आली

तसं पाहिलं तर मुक्तासारख्या अभिनेत्रीसाठी प्रत्येक भूमिका भरपूर अनुभव देणारी असली तरी 'स्माईल प्लीज'साठी फोटोग्राफर बनण्याचा अनुभव काही वेगळाच असल्याचं ती मानते. मुक्ता तिच्या फोटोग्राफीच्या अनुभवाबद्दल म्हणाली की, फोटोग्राफी हे माध्यम असं आहे की, यात भाषेची नाही तर चांगल्या दृष्टीची आवश्यकता असते. मी यापूर्वी कधीही कॅमेरा हाताळला नव्हता, पण या चित्रपटाच्या निमित्तानं मला काही अंशी फोटोग्राफी शिकता आली. सारखा कॅमेरा हातात असल्यामुळं आता मलासुद्धा फोटोग्राफीची आवड निर्माण झाली.

 

१९ जुलै रोजी प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगानं, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित  'स्माईल प्लीज' हा चित्रपट विक्रम फडणीस यानं दिग्दर्शित केला आहे. फॅशन डिझायनिंगकडून चित्रपट दिग्दर्शनाकडं वळलेल्या विक्रमचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी त्यानं 'हृदयांतर' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १९ जुलै रोजी 'स्माईल प्लीज' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्तासोबत प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन या मराठीतील कसलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत.हेही वाचा -

रुपाली-अभिजीतमध्ये रंगणार कॅप्टन्सीची लढत

Video: 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे परत येतोय… ‘या’ तारखेला
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा