Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

अनाजी पंतांच्या फितूरीला देहांताची शिक्षा

छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंत आणि त्यांच्यासोबत कुटील कारस्थान रचणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फर्मावली आहे. लवकरच अनाजींना हत्तीच्या पायी देण्यात येणार आहे.

अनाजी पंतांच्या फितूरीला देहांताची शिक्षा
SHARES

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सध्या अत्युच्च ठिकाणी पोहोचली आहे. दिवसेंदिवस या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंत आणि त्यांच्यासोबत कुटील कारस्थान रचणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फर्मावली आहे. लवकरच अनाजींना हत्तीच्या पायी देण्यात येणार आहे.

फितुरीचा शाप

मराठ्यांच्या इतिहासालाही फितुरीचा शाप आहे. याच फितुरीला चाप बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठवल्या होत्या. पण शिवरायांच्या पुत्राविरोधात बंड करून उठले ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख असलेले अनाजी पंत. शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अनाजी संभाजी महाराजांविरोधात फितुर झाले. कारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली. आजवर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचलेले प्रसंग स्वराज्यरक्षक संभाजीच्या माध्यमातून पहायला मिळत आहेत. यातील अनाजी पंतांच्या शिक्षेच्या प्रसंगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्वराज्याचा तुकडा

शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा संभाजी महाराज छावा होते. तेवढेच प्रतापी, शूर, पराक्रमी. त्यामुळं वडिलांनी आखून दिलेल्या महामार्गावर चालताना त्यांचे विचार आणि आचार संभाजी महाराजांनीही अमलात आणले. स्वराज्याचा तुकडा पाडू इच्छिणाऱ्या नराधमांना देहांताची शिक्षाकठोर शिक्षा फर्मावली. हाच सगळा इतिहास स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुन्हा एकदा जिवंत होऊन प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. इतिहासातल्या या प्रसंगाची अत्यंत रोमहर्षक मांडणी या मालिकेत करण्यात आली आहे.हेही वाचा -

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय

'पावती घ्या, मगच पैसे द्या', मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहनसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा