• 'अर्थसाक्षर पुरस्कार 2016' जाहीर
SHARE

मुंबई - आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अर्थसंकेत संस्थेद्वारे दरवर्षी दिला जाणारा "अर्थसाक्षर पुरस्कार" बुधवारी जाहीर करण्यात आला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये शुक्रवारी 23 डिसेंबरला संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अर्थसंकेतचे संस्थापक अमित बागवे आणि सह-संस्थापक रचना बागवे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असूम 200 जागा मर्यादीत आहेत.

या पुरस्काराला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, एसएमई (स्मॉल मिडियम एंटरप्रायझेस) च्या प्रमुख रचना भुसारी, एनएसडीएलचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट निलेश पंडित हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ‘मुंबई लाइव्ह’वर केलं जाणार असून ते पाहण्यासाठी https://goo.gl/NCqr6E यावर क्लिक करा.

प्रगतिशील गुंतवणूकदार पुरस्काराचे मानकरी

अतुल अत्रे, प्रतिमा आंबेकर, वर्षा कुंडईकर

आर्थिक साक्षरता प्रचारक पुरस्काराचे मानकरी
धर्मेंद्र पवार

मराठी युवा उद्योजक - महिला पुरस्काराच्या मानकरी
अमृता गव्हाणकर - जोशी

आर्थिक साक्षरता प्रचारक पुरस्कार मानकरी
पुर्णिमा शिरीषकर

गुंतवणूक तारा पुरस्काराचे मानकरी
प्रशांत परब
सर्वोत्कृष्ट व्यवसाय प्रशिक्षक पुरस्काराचे मानकरी
डॉ. शिवांगी झरकर
मराठी युवा उद्योजकचे पुरस्कार मानकरी
महेश काळे
मराठी युवा उद्योजक - महिला (नावीन्यपूर्ण व्यवसाय)
प्रेरणा प्रकाश तटकरे
मराठी युवा उद्योजक (नावीन्यपूर्ण उद्योजक)
सागर जोशी, योगेश राऊत
उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मानकरी
सुवर्ण कोकण (टीव्ही शो)
मराठी बिझनेस एक्स्चेंज (टीव्ही शो)

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या