महिला दिनी कन्यारत्नाचा जन्म

 Kandivali
महिला दिनी कन्यारत्नाचा जन्म

कांदिवली - जागतिक महिला दिन बुधवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. कांदिवलीतल्या लाइफ लाइन रुग्णालयात एका गोंडस परीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेणुका लहाने यांनी 6 वाजून 14 मिनिटांनी एका मुलीला जन्म दिला. महिला दिनाच्या दिवशी मुलीचा जन्म झाल्याने रुग्णालयात जल्लोष साजरा करण्यात आला. 

या जल्लोषात आर साऊथचे ऑफिसर साहेबराव गायकवाड सहभागी झाले होते. आर वॉर्डमध्ये महिला दिनी मुलीचा जन्म झाल्याची माहिती पालिकेला देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालय गाठले आणि मुलीच्या आई आणि वडिलांना शुभेच्छा दिल्या.

Loading Comments