Advertisement

बिग बॉस मराठी धमाकेदार डान्सचा तडका

बिग बॉसच्या घरात सारं काही घडतं. विविध टास्क आणि वादविवाद हे इथल्या सदस्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत, पण आता या घराला धमाकेदार डान्सचा तडकाही दिल्याचं पहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी धमाकेदार डान्सचा तडका
SHARES

बिग बॉसच्या घरात सारं काही घडतं. विविध टास्क आणि वादविवाद हे इथल्या सदस्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत, पण आता या घराला धमाकेदार डान्सचा तडकाही दिल्याचं पहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आता जंगी सेलिब्रेशन होणार आहे. सदस्य धमाल, मस्तीच्या मूड आहेत. फूल पार्टी मूड असणार आहे, कारणदेखील तसंच आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर बीबी बर्थडे पार्टी हे कार्य सोपावलं आहे. त्यामुळं सदस्य एकदम मस्तीच्या मूडमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आरोह ‘सैराट’ चित्रपटाच्या गाण्यावर ‘झिंगाट…’ डान्स करताना दिसणार आहे... ‘झिंगाट…’ गाण्यावर सगळेच सदस्य दिलखुलासपणं डान्स करताना करणार आहेत. शिवनंही ‘मल्हारी…’ या गाण्यावर डान्स सादर केला आहे. आरोह आणि शिवच्या या धमाकेदार डान्सनं घरामधील पार्टीला अजूनच रंगत येणार हे निश्चित.

वीणा, शिवानी, नेहा, किशोरी हे कोणत्या गाण्यावर नृत्य सादर करतील हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. एकीकडं धमाल-मस्ती सुरू आहे, तर दुसरीकडं बिचुकले कोणावर तरी चिडल्याचं दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे. ज्यासाठी सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे. याच मुद्यावरून सदस्यांमध्ये वाद होणार आहे. बिचुकले आज नेहावर चिडला आहे.

बिचुकलेचं म्हणणं आहे की, मी केलेली सजावट तू का काढून टाकलीस? त्यावर आरोह म्हणाला की, तुम्ही आता जाऊन बघा कुठलं चांगलं दिसत आहे. आधीच की आताच? त्यावर बिचुकले म्हणाला की, आम्ही करू ते चांगलं नसतंच का? वीणाचं म्हणणं आहे की, आमच्या पण काही भावना असतात, मी नेहाला म्हणाले असू दे पण तिनं नाही ठेवलं जाऊ दे आता... माझं इतकंच म्हणणं आहे की प्रत्येकानं जे काम केलं आहे ते असू द्यायला हवं. त्यावर नेहाचं म्हणणं होतं की, ते खूप शॅबी दिसत होतं.

वीणानं नेहाला सांगितलं की, इतकं पण घाण नव्हतं दिसत. किशोरी शहाणे यांचं देखील म्हणणं होती की, ज्यांनी ते केलं होतं. त्यांच्या भावना दुखावल्या. वीणानं आरोहला सांगितलं की, प्रत्येकाला जे करायचं आहे ते करू दे. त्यावर बिचुकले म्हणाला की, आम्ही बाजूला थांबलो असतो तुम्ही करत आहात तर आम्ही फक्त बघत रहातो. नंतर नेहानं माफी मागितली पण, आता हा वाद किती पुढे गेला? खरच हा वादाचा मुद्दा होता का ? ते पहायचं आहे.हेही वाचा  -

Movie Review : पोलीसरूपी माणसातील माणुसकीची कथा

Movie Review : खेड्यातील वास्तव दाखवणारी शर्यत
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा