नेहाचा सुरेखा पुणेकरांवर आरोप

या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही, मात्र पराग कान्हेरेनं घरामध्ये राहू नये, असं सर्वांचं मत असल्यानं त्याला घराबाहेर जावं लागलं.

नेहाचा सुरेखा पुणेकरांवर आरोप
SHARES

महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठीच्या घरामधील सर्व सदस्यांना सरप्राईझ दिलं. त्यांनी चॉकलेट्स आणल्यानं सर्वजण खुश झाले. या आठवड्यामध्ये वोटीग लाईन्स बंद होत्या. त्यामुळं कुणीच घराबाहेर जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं, मांजरेकरांच्या सांगण्यानुसार या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही, मात्र पराग कान्हेरेनं घरामध्ये राहू नये, असं सर्वांचं मत असल्यानं त्याला घराबाहेर जावं लागलं.


नॉमिनेशन टास्क

आता घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. घरामधील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे, जे घरात रहाण्यासाठी अपात्र आहेत. हे कार्य पूर्ण करण्यासाठी बिग बॉस यांनी काही निकष देखील सदस्यांना सांगितले आहेत. जसे, आतापर्यंतची घरातील तसेच कार्यादरम्यानची निराशाजनक कामगिरी, हा खेळ समजण्याइतपत बौद्धिकचातुर्य नसणं, बिग बॉस यांनी दिलेल्या कार्यात आपली भूमिका नीट न बजावणं, या खेळात डावपेच आखण्याची क्षमता नसणं. या निकषांवरून कोण कोणाला नॉमिनेट केलं जातं ते पहायचं आहे.


साबणाच्या पाण्यावरून वाद

घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखा यांच्यामध्ये वाद होणार आहे. या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत. ज्यामध्ये सुरेखा यांनी नेहाला बजावून सांगितलं की, साबणाचं पाणी वापरू नका. यावरून वादाला सुरुवात झाली, नेहाचं म्हणणे होतं कि, तुमच्या पिचकाऱ्या नाही चालत, म्हणून आम्हाला जे सुचलं आहे त्याची माती करणार का? डोक आहे तर मग स्वत: चालवायचं होतं. नेहाची ही बडबड ऐकून अभिजीत केळकर नेहाला म्हणाला की, किती बडबड करतेस बस आता. सुरेखा यांनी तिला बजावलं कि, मला साबणाचं पाणी काढू दे. पिचकारी मला दे, पण त्यावर नेहा म्हणाली की, साबणाचं पाणी त्यात नाही आहे. खेळा त्यांच्या बाजूनं. त्यावर सुरेखा यांचा आवाज चढला आणि त्या म्हणाल्या की, मी त्यांच्या बाजूनं नाही खेळत आहे. नेहा आणि सुरेखा यांच्या वादाच्या वातावरणात हा टास कोण जिंकतं ते पहाणं रोमांचक ठरणार आहे.हेही वाचा -

१९ वर्षांच्या करीनाचा ‘अंग्रेजी’ अवतार पाहिला का?

अण्णा बनून साऊथ आफ्रिकेहून परतला संजय नार्वेकरसंबंधित विषय