Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'नमो युवा रोजगार केंद्रा'चे उद्घाटन


SHARES

शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देतानाच युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या 'नमो युवा रोजगार केंद्रा'चे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

'मी मुंबई अभियान-अभिमान' आणि 'श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड'ने ही योजना तयार केली आहे. 'मी मुंबई अभियान-अभिमान'चे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे.

या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई महापालिका गटनेते मनोज कोटक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते.



काय आहे 'नमो युवारोजगार केंद्र' ?

शेतकरी आठवडी बाजार, चालता फिरता शेतकरी बाजार तसेच 'आईचा डब्बा' अशी अभिनव संकल्पना साकारत शेतीमालाला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'नमो युवा रोजगार केंद्र' सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना योग्य भावात ताजी उत्पादने देतानाच युवकांना रोजगार मिळवून देणे हा या संकल्पनेचा प्रमुख्य उद्देश आहे.


शेतकरी, मुंबईतील गरिबांसाठी फायदेशीर योजना

संस्थेमार्फत महिन्याभरात ३० ठिकाणी आठवडी बाजार भरवला जातो. या नव्या योजनेवर आम्ही ६ महिने अभ्यास केला. त्यानुसार मुंबईत १२५ गाड्या ज्यात १०८ गाड्या शेतकरी आठवडी बाजार, तर इतर गाड्या पतंजली आणि 'आईचा डब्बा' या उपक्रमासाठी असतील. यानुसार राज्यभरात ५०० गाड्या सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
प्रसाद लाड, अध्यक्ष, मी मुंबई अभियान-अभिमान'



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नमो युवारोजगार केंद्रा'चे कौतुक करताना महाराष्ट्रात ५०० नव्हे, तर ५००० गाड्या सुरू करण्याचा हौसला ठेवा, असा सल्ला आयोजकांना दिला.


शिव वडापावला टक्कर देणार

काही राजकारणी पुत्रोदयासाठी काम करणारे असतात, असा टोला लगावत आशिष शेलार यांनी रोजगारभिमुख 'नमो युवा रोजगार केंद्रा'द्वारे शिववड्याला पर्याय दिल्याचे कोणाला वाटत असेल तर तसा अर्थ घ्या, असा चिमटा शिवसेनेला काढला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा