Advertisement

मुलुंडमध्ये 'वायू शक्ती'चं दर्शन!


मुलुंडमध्ये 'वायू शक्ती'चं दर्शन!
SHARES

भारतीय सैन्य कशा पद्धतीने शत्रूंचा खात्मा करते? नेमकी कोणती शस्त्र वापरते? आणि त्यांचा वापर कसा केला जातो? असे अनेक प्रश्न तुम्हाला जर पडत असतील, तर मग तुम्ही मुलुंडमधील भारतीय वायुसेनेच्या या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या.



मुलुंडमध्ये 'वायू शक्ती' प्रदर्शन

मुलुंडमधील वामनराव मुरंजन शाळेतील पटांगणात महाराष्ट्र सेवा संघ आणि भारतीय वायू सेना, मेरीटाईम एअर ऑपरेशन यांच्या वतीने 'वायू शक्ती' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वायू सेनेची रडार्स, मिसाईल लॉन्चर्स, फायटर एअरप्लेन मॉडेल, ट्रान्सपोर्ट प्लेन्स, कमांडो सूट्स, ड्रोन्स आणि एरो मॉडेलिंग इत्यादी वायूसेनेचे युद्ध साहित्य सामान्य नागरिकांना जवळून पाहायला मिळत आहेत.




प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्याचबरोबर वायू सेनेत करियर कसे करता येईल? तसेच वायू सेनेत मोठी कामगिरी गाजवलेल्या अधिकाऱ्यांची माहिती या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच सेनेशी संबंधित विविध पुस्तके आणि माहिती पत्रके यांचे प्रदर्शन ही इथे भरवण्यात आले आहे. रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे महत्त्व तर कळेलच, सोबतच त्यांचा कल सैन्याकडे वाढेल आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना जागृत होईल, अशी आशा या कार्यक्रमाचे आयोजक आणि महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी व्यक्त केली.



या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना वायू सेनेची विविध हत्यारे, मिसाईल तसेच साहित्याची माहिती तर मिळालीच, शिवाय करिअर कसे करावे? याचे मार्गदर्शन मिळाल्याने वायू सेनेत भरती होण्याची इच्छा होत आहे.

सेजल हडकर, विद्यार्थिनी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा