मानवाधिकार असोसिएट्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 Dadar
मानवाधिकार असोसिएट्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मानवाधिकार असोसिएट्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
See all

दादर - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीनं गुरुवारी 'घे भरारी' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 2017च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दादरमधल्या सेंट्रल रेल्वे ऑफिसर्स क्लबच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात असोसिएट्सच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. तसंच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री माधवी मोरे उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत वाघचौरे, राष्ट्रीय अध्यक्ष वामन साळगावकर, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब, मीना जोशी आदी उपस्थित होते.

Loading Comments