महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा बस


SHARE

मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागामार्फत महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबरला जादा गाड्या चालवल्या जातील. 5 डिसेंबर रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी रात्री 8 पासून ते 6 डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत जादा गाड्या सुरू ठेवल्या जाणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात चैत्यभूमिला भेट देणाऱ्या ग्रामीण भागातून आलेल्या अनुयायांसाठी महत्त्वाच्या बस थांब्यांवर बसनिरीक्षक आणि अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. तर शिवाजी पार्क बेस्ट चौकी परीसरात वाहतुकीची माहिती देणारं केंद्रही सुरू असेल. आरएफ-आयडी स्मार्टकार्ड ओळखपत्राविना शहरी 40 रुपये, उपनगरीय 50 रुपये, मॅजिक 70 रुपये आणि दैनंदिन बस पास शिवाजी पार्क परिसरातल्या उपक्रमांच्या बूथवर वितरीत मिळू शकतील. बेस्टच्या ‘आनंद यात्री’ योजनेंतर्गत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या अनुयायांना पास अर्ध्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात येईल. गुरुवार 1 डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत बेस्टकडून ही माहिती देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या