प्रबोधकचा कार्यक्रम संपन्न

 Andheri
प्रबोधकचा कार्यक्रम संपन्न
प्रबोधकचा कार्यक्रम संपन्न
प्रबोधकचा कार्यक्रम संपन्न
प्रबोधकचा कार्यक्रम संपन्न
See all

जोगेश्वरी - प्रबोधक नाट्यवलयतर्फे एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता शाळेत पार पडला. त्यानिमित्ताने "लेखकांचे अधिकार" या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमात अॅडव्होकेट दीपक परमार यांनी कॉपीराईट आणि लेखक या विषयावर सुंदर विवेचन केले. लेखक का व्हावेसे वाटले ते लेखकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा रंगली. याप्रसंगी प्रबोधक प्रकाशित जयेश मेस्त्री लिखित "स्वप्न-दोष" या गुप्तहेरकथेच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाल मनीषा कोरडे, आकाशआदित्य लामा, अभिराम भडकमकर, विश्वास सोहनी आणि जयराज साळगावकर अशी दिग्गज आणि अनुभवी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.

Loading Comments